आभाळात गरजून जातो
बरसून जातो काळा मेघ
मेघ नावाच्या डोळ्याखाली
दाट उमटते काजळाची रेघ
अश्रू म्हणून पाणी
बरसू लागतात धरतीवर
श्रावणसरी नाचू लागतात
तहानलेल्या धरतीवर
सुख सुख म्हणून खूप कोसळतात
पावसाचे अश्रू
अशा या निरलस पावसाला
तू नको विसरू
मी का? तू हि भीज
ओल दाटू दे मनात
मिठीत असते मिठास प्रेमाची
हे असू दे ध्यानात
वाळू दे असेच ओलेते अंग
नकोच बदलू साडी
पाऊस नसताना मला भिजवणारी
तू एक मात्र वेडी…
आभाळात गरजून जातो
बरसून जातो काळा मेघ
मेघ नावाच्या डोळ्याखाली
दाट उमटते काजळाची रेघ
– मस्त, सुरेख!