मराठीला न्यायचे आहे कुठे??


काल लोकमत वर झालेला हल्ला पहिला, त्याची ब्रेअकिंग बातमी पाहिली, हल्ली ब्रेकिंग बातमी कशाचीही होत असतेच
आणि हल्लेही कुठल्यातरी प्रकारचे होताच असतात……..
आपणास कुठे जावयाचे आहे आणि आपण कुठे जात आहोत?, महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांची दिशाभूल होत आहे हे खरे आहे.
प्रत्येकजण मराठीचा मुद्दा आपलाच असा विचार करून त्याचे राजकीय भांडवल करू पाहतोय.
राज आणि उद्धव यांचे भांडण मराठी वरून नाही तर अहंकारावरून झाले आहे…..
राज ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये राहूनच जर मराठीचा मुद्दा किवा तत्सम प्रकारचा पुढे नेला असता ,
स्वताचे कौशल्य (जे वादातीत आहे ) ते दाखवले असते तर कदाचित शिवसेना एकजूट राहिली असती
मनसे चा जन्म झाला नसता….. आणि मराठी माणसाची गोंधळाची स्थिती राहिली नसती…….
एकीकडे मराठीच्या मुद्द्याचे राजकारण होत असताना… इतर प्रिंट मेडिया किवा इलेक्ट्रोनिक मेडिया सुद्धा अशा प्रकारे नको असलेल्या गोष्टी जास्त वेळाप्रकाशित
करून प्रेक्षकांच्या मनावर एक परिणामकारक छाप सोडत असतात…….
देशाच्या सुरक्षेच्या विषयी किवा इतर गुप्त बाबी जास्ती उघड न करणे किवा तत्सम बाबी त्यांनी दाखवणे कटाक्षाने टाळले पाहिजे..
एकीकडे आधुनिकतेची टिमकी वाजवत असतानाच, दुसरीकडे वजन कमी करणे, नवरत्नांचे दागिने वगैरे किवा भविष्य विषयक कार्यक्रम प्रसारित करून एक प्रकारचा
विरोधाभास त्यांच्या वागण्यात दिसतो…
तुम्ही जे दाखवता त्याचा चांगला परिणाम झाला पाहिजे, वाईट गोष्टींचे निर्मुलन झाले पाहिजे, पण हेच करताना आपणही कुठे चुकत नाही ना, आपल्या ब्रेकिंग बातम्या कुणाच्या
विचारांचे दालन तोडत नाहीत ना.. या सर्व गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत , या साठी एखादा कायदा झाला पाहिजे
एकूणच सर्व स्तरातून असे प्रयत्न झाले पाहिजे,
एकूणच राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातून नेमकी दिशा ठरवली गेली पाहिजे, कि मराठी भाषा आणि महाराष्ट्राची वाटचाल कशी असणार आहे ते
नाहीतर तिचा र्हास व्हायला फारस वेळ लागणार नाही हे चित्र आता दिसू लागले आहे..

1 thoughts on “मराठीला न्यायचे आहे कुठे??

Leave a reply to Harish Potdar उत्तर रद्द करा.