मुक्या भावनांचा तू सारांश आहे
माझ्या जीवनाचा तू श्वास आहे
परी सांग ना कैसा आभास आहे
तुझी साथ हि अंतता: आस आहे
कबुली तुझी ती मला खास आहे
प्रेमातल्या प्रेमाचा श्वास आहे
कळावे कुणाला कसे भास आहे
तुझ्या माझ्या नात्यात विश्वास आहे
विश्वास परी तो उच्छ्वास आहे
तुझे असणे माझा सहवास आहे