कधी काली सखे तुझा
होता अट्टहास
श्वास असा असावा
ज्यातून फ़क्त दिसावा विश्वास

कधी काली सखे तुझे
होते असे लाजणे
डोळ्यातून शब्दफूले
वहायचे नज़राने

कधी काली सखे तुझ्या
पापण्या ओलावल्या
अश्रुना घेवुन अलगद
लोचनी त्या विसावल्या

कधी काली सखे तुला
मुग्ध होता पाहिले
तव दृश्याने मन माझे
मंत्रमुग्ध जाहले

5 thoughts on “

Leave a reply to vinayak R ghode उत्तर रद्द करा.